कारणराजकारण : 'खराब रस्त्यामुळे वाटेतच झाली होती प्रसूती' (व्हिडिओ)

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

आंबू या गावातील एक गर्भवती महिलेची प्रसूती चार महिन्यांपूर्वी रस्त्यावर करावी लागली. त्याचे कारण अतिशय खराब रस्ता. 20 किलोमिटर अंतर पार करण्यासाठी चवळपास दोन तासचा वेळ लागतो, करंजविहिरे आणि परिसरातील नागरिक रस्त्याची स्थिती आणि त्याचे होणारे परिणाम सांगत होते.

करंजविहिरे (पुणे) : आंबू या गावातील एक गर्भवती महिलेची प्रसूती चार महिन्यांपूर्वी रस्त्यावर करावी लागली. त्याचे कारण अतिशय खराब रस्ता. 20 किलोमिटर अंतर पार करण्यासाठी चवळपास दोन तासचा वेळ लागतो, करंजविहिरे आणि परिसरातील नागरिक रस्त्याची स्थिती आणि त्याचे होणारे परिणाम सांगत होते.

स्थानिक आमदार सुरेश गोरे यांचे या भागात निवासस्थान असून पाच वर्षांपासून ते सत्तेत आहेत. मात्र, त्यांना साधा रस्ता निर्माण करता आला नाही. खासदार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील शिवसेनेचेच आहेत. गेल्या निवडणुकीत येथील नागरिकांनी शिवसेनेला भरभरुन साध दिली होती .पण, या भागाचा कोणताही विकास झाला नसल्याने स्थानिकांचा खासदार आणि आमदार यांच्यावर प्रचंड रोष आहे. 

याबरोबरच भामा आसखेड धरणा शेजारील गावांना  पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तसेच या धरणाचे पाणी पोलिस बंदोबस्तामध्ये पाणी पुण्याकडे नेले जाते. मात्र, धरणाच्या जवळील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी दिले जात नाही. अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. खराब रस्ता, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी, रोजागर हे येथील प्रमुख प्रश्न आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' कारणराजकारण मालिकेद्वारे सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

Web Title: Karanrajkaran discussion with karanjvihire villagers about their issue at Shirur Loksabha constituency