कारणराजकारण : खराडीतील थिटे वस्तीतील नागरिक वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेशुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

खराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवार याठिकाणी फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे आम्ही वाऱ्यावर आहोत अशी भावना येथील नागरिकांनी सकाळच्या कारणराजकारण या फेसबुक लाईव्ह मालिकेत व्यक्त केली.

एकिकडे उंच उंच इमारती दुसरीकडे प्रचंड लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्या अशी मिश्र वसाहत खराडीत आहे. रस्त्यावरून जात असलेल्या महिलांची, मुलींची छेड काढणे, त्यांना  चिडवणे असे प्रकार सर्रास याठिकाणी घडत आहेत. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र अद्याप हे प्रकार थांबलेले नाहीत, अशी माहिती येथील महिलांनी दिली. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या तरी तेथे बाहेरून आलेल्याना नोकऱ्या दिल्या जातात. त्यामुळे स्थानिक तरुण बेरोजगार आहे, अशी खंत तरुणांनी व्यक्त केली. येथील जेष्ठ नागरिकांचे प्रश्न देखील ज्वलंत आहेत.

माणसे कमी डास जादा 
वस्तीजवळ असलेल्या नदीवर पंधरा दिवसापूर्वी अनधिकृतपणे बंधारा टाकण्यात आला आहे बरं. त्यामुळे तेथे जलपर्णी निर्माण झाल्या आहेत.  जलपर्णी आणि अडवलेल्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छर वाढले आहेत. रस्त्यावर चालताना देखील डास बाजूला करीत चालावे लागते अशी स्थिती आहे. माणसांप्रमाणे डासच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने थिटेवस्तीवर अक्षरशः हैराण झाले आहेत.

Web Title: Karanrajkaran discussion with kharadi citizens