कारणराजकारण : अंगारमळा; शरद जोशींची कर्मभूमी (व्हिडिओ)

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शरद जोशी यांची कर्मभूमी 'आंबेठाण' - इथे तपासतोय शेतकरी संघटनेचं अस्तित्व... (व्हिडिओ पाहा)
 

अंगारमळा (चाकण) : शेतकरी नेते शरद जोशी यांची कर्मभूमी चाकणजवळ अंगारमळा येथे आहे. ज्यावेळी शरद जोशी परदेशातून येथे आले त्यावेळेस त्यांनी इथल्या भागाची शेतीसाठी निवड केली. 1979ला ते परदेशातून येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे हे एकमेव ध्येय समोर ठेवले. बळीराजाचा बळी गेला नाही पाहिजे हे त्यांचे लक्ष होतं.

शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी माळरानावर शेती कशी फुलवावी, शेतकऱ्यांना दिशा मिळावी यासाठी शरद जोशी यांनी हा अंगार मळ्याचा प्रयोग राबवला. यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना ही केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या संघटनेसोबत बरेच लोक जोडले गेले. चाकण भागात हा कांदा उत्पादनाचा मोठा परिसर आहे या परिसरातून परदेशातही कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते शेतकऱ्यांच्या या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी चाकण ला खूप मोठे आंदोलन उभे राहिले.

1988 ला झालेल्या या आंदोलनाची तीव्रता एवढी मोठी होती की शेतकऱ्यांनी बैलगाड्या अक्षरशा रस्त्यावर आणून हे आंदोलन केले होते शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं आणि उमेद देण्याचे काम शरद जोशी यांनी तेथूनच केलं.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

Web Title: KaranRajkaran information about place where Sharad Joshi worked