कारणराजकारण : डॉ. अमोल कोल्हे बालिश : आढळराव पाटील

शनिवार, 13 एप्रिल 2019

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचारातील वक्तव्य बालिश आहेत, असा टोला शिरुर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लगावला. तसेच त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले.

पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचारातील वक्तव्य बालिश आहेत, असा टोला शिरुर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लगावला. तसेच त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले.

'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या उपक्रमात आढळराव सकाळशी बोलत होते. डॉ. कोल्हे हे अभिनेते असल्याने खोटे आरोप करण्याचा अभिनय ते उत्तम प्रकारे करतात, अशी कोपरखळी त्यांनी कोल्हेंना मारली. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे डॉ. कोल्हे यांच्या थेट लढत होत आहे. येत्या 29 तारखेला येथे मतदान होत असून प्रचार शिगेला पोचला असल्याने दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

'सकाळ'च्या फेसबुक लाईव्हवर गुरुवारी कोल्हे यांनी त्यांच्या संपत्तीवरुन झालेले आरोप खोटे असल्याचे सांगत आढळराव यांनी खासदारकीचा राजिनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर बोलताना आढळराव म्हणाले, " डॉ. कोल्हे यांचावर सोशल मीडियात होणाऱ्या टिकेला ते मला जबाबदार धरतात, यावरुन त्यांचा बालिशपणा दिसून येतो." विरोधकांकडे विकासचे धोरण नसल्याने ते माझ्यावर आरोप करत आहेत, असेही ते म्हणाले.

बैलगाडी शर्यतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात बंदी आली असून बंदी उठविण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप राष्ट्रवादीवर आढळराव यांनी केला. तसेच आपण ही बंदी उठविण्यासाठी सतत पाठवपुरावा करत असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

मतदारसंघाच्या विकासाबाबत विरोधक करीत असलेल्या टिकेला उत्तर देताना आढळरावांनी मागील 15 वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामांची, मंजुरी मिळालेली कामे, प्रस्थावित कामे, अशा विविध विकास कामांची माहिती दिली. त्यांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पंकजा मुंडे, आदित्य ठाकरे यांचा पचार सभा येत्या काळात होणार असून या निवडणुकीत आपण विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: KaranRajkaran interview of Shirur MP Shivajirao Adhalrao Patil by Samrat Phadnis