कारणराजकारण : इंदापूर कोणाला देणार साथ; सुळे मताधिक्य कायम राखणार?

बुधवार, 10 एप्रिल 2019

इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे व हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र प्रचार करत आहेत का, पाटील सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार का अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आम्ही 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत मागोवा घेतला.

इंदापूर : इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे व हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र प्रचार करत आहेत का, पाटील सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार का अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आम्ही 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत मागोवा घेतला. या दरम्यान सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

वयोश्री सारख्या योजनेमुळे वृद्धांना आधार मिळाला, मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून सायकलींचे वाटप, पाणीपुरवठा, रस्त्यांची कामं सुप्रिया सुळेंनी केली आहेत. त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले, तरी त्यांनी ती बाजूला ठेवली व चांगले काम केले व त्याच विजयी होणार, असे मत राष्ट्रवादीच्या कार्यक्रत्यांनी व्यक्त केले. 

मंत्री गिरीश बापट यांनी कामगारांचा प्रश्न सोडवला, मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते असल्याने त्यातही विकास झाला आहे. तसे फडणवीस यांनी मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळांचा प्रश्नही सोडवला आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवार कांचन कुल विजयी होतील, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.  

Web Title: Karanrajkaran opinions of party workers in Indapur