कारणराजकारण : राहू गाव देणार कांचन कुल यांना साथ (व्हिडिओ)

मंगळवार, 9 एप्रिल 2019

कारणराजकारणच्या या उपक्रमांतर्गत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये फिरत असताना राहू गाव हे भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

राहू (पुणे) : कारणराजकारणच्या या उपक्रमांतर्गत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये फिरत असताना राहू गाव हे भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

राहु हे गाव विद्यमान आमदार राहुल कुल यांचे गाव असून त्यांच्या पत्नी बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. साधारणतः दहा हजार लोकसंख्या असलेले हे गाव असून चार ते साडेचार हजार मतदान या गावातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साडेचार हजार मतदानापैकी चार हजार मतदान भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना होईल असे सध्यातरी गावकरी सांगत आहेत.

आमदार राहुल कुल यांच्या बाजूने सध्या गावकरी उभे आहेत राहुल कुल राहूचे स्थानिक असल्या कारणाने या गावातून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याची शक्यता आहे. राहुल कुल यांनी विकास कामावर भर देत राजकारण केले आहे असे इथल्या गावकर्‍यांचं म्हणणं आहे तर मागील दहा वर्षापासून सुप्रिया सुळे यांनी या गावाकडे पूर्णपणे लक्ष दुर्लक्ष केलेलं आहे असे येथील गावकरी उघडपणे सांगतात. त्याचबरोबर,  2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली पण आतून राहुल कुल यांना पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे इथल्या गावकर्‍यांचं म्हणणं आहे आणि तोच संताप गावकऱ्यांच्या मनात सध्या तरी आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर मतदानातून होण्याची शक्यता ही सांगता येत आहे.