कारणराजकारण : 'स्वराज्य रक्षक संभाजी' कधीच बंद होणार नाही : अमोल कोल्हे

अशोक गव्हाणे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मालिका वेगळी आणि राजकारण वेगळं आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मालिकेच्या नावावर कुठल्याही प्रकारचे राजकारण विरोधकांनी करू नये.

- अमोल कोल्हे

पुणे : पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर #कारणराजकारण या मालिकेतून मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेताना कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहेत. 

स्वराज्य रक्षक संभाजी की मालिका माझ्याकडून तरी बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, मालिका बंद करण्यासाठी विरोधकांकडून मालिकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि हे सर्वात घाणेरडे राजकारण आहे. पण ही मालिका आणि निवडणूक आयोगाकडून ही याचिका फेटाळण्यात आली त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार.

पहिल्यांदा छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर जगन जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात असताना विरोधी पक्ष अशा प्रकारचे राजकारण करत आहेत. आत्ताही दिवसातले 20 ते 21 तास मी या मालिकेसाठी काम करत आहे. या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातही शूटिंग चालू आहे. मालिका वेगळी आणि राजकारण वेगळं आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मालिकेच्या नावावर कुठल्याही प्रकारचे राजकारण विरोधकांनी करू नये.

Web Title: Karanrajkaran swarajya rakshak sambhaji serial will never stops says Amol Kolhe