कारणराजकारण : हर्षवर्धन पाटलांच्या बावड्यातून कोणाला मताधिक्य? (व्हिडिओ)

बुधवार, 10 एप्रिल 2019

बावडा या भागात पाण्याचा व रस्त्याचा प्रश्नही मोठा आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही त्यामुळे आगामी सत्ताधाऱ्यांनी तो सोडवावा अशीच इच्छा सर्वांनी व्यक्त केली. 

बावडा (ता. इंदापूर) : शरद पवारांचे प्रतिस्पर्धी शंकरराव बाजीराव पाटील यांचे बावडा हे गाव. पवार लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी या भागात पाटलांचे वर्चस्व होते. #कारणराजकारण या मालिकेत आपण आढावा घेतला आहे, तो या गावातून आता कोणाला पाठिंबा मिळणार याचा. शंकरराव बाजीराव पाटील यांचे नातू हर्षवर्धन पाटील यांचीही साथ बारामती मतदारसंघातल सुप्रिया सुळेंना महत्त्वाची आहे. 

आता डिजिटल युगात सध्याचे राजकारणी जोरात प्रचार करतात. पण जुन्या काळी कसा प्रचार केला जायचा याचा आढावा आम्ही घेतला शंकरराव बाजीराव पाटील यांच्या सहकाऱ्यांकडून. पूर्वीच्या काळी पायी चालत, बैलगाडीतून, सायकलीवर, ट्रॅक्टरमधून, बैठका घेऊन होत असे. 1 महिना प्रचार जोरात चालायचा, असे मत वृद्ध लोकांनी व्यक्त केले. तसेच घराणेशाहीवरही लोकांनी मत मांडले. 

बावडा या भागात पाण्याचा व रस्त्याचा प्रश्नही मोठा आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही त्यामुळे आगामी सत्ताधाऱ्यांनी तो सोडवावा अशीच इच्छा सर्वांनी व्यक्त केली. 

Web Title: Karanrajkaran villagers speaks at bawda about local politics