कारणराजकारण : खुटबाव देणार सुप्रिया सुळेंना साथ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

'गेली 45 वर्षे आमच्या गावात निवडणूक हा विषयच नाही, येथे बिनविरोध निवडणूक होते. आमच्या गावातला मतदार हा शरद पवार यांना मानणारा आहे. त्यामुळे आताही आमचा पूर्ण पाठिंबा सुप्रिया युळे यांनाच आहे व त्याच विजयी होणार, असे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

खुटबाव (दौंड) : 'गेली 45 वर्षे आमच्या गावात निवडणूक हा विषयच नाही, येथे बिनविरोध निवडणूक होते. आमच्या गावातला मतदार हा शरद पवार यांना मानणारा आहे. त्यामुळे आताही आमचा पूर्ण पाठिंबा सुप्रिया युळे यांनाच आहे व त्याच विजयी होणार, असे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

20 वर्षे शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली काम केलेलेच लोक आता भाजपमध्ये जाऊन तिकीट मिळवून निवडणूकीला उभे आहेत. पवार दिल्लीत असतील तरच आपल्याला किंमत आहे, नाहीतर आपला विचार कोणीही करणार, त्यामुळे तालुक्यातील लोकांनी ठरविले आहे की पवारांनाच निवडून द्यायचे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

पवार कुटूंबियांनी या मतदारसंघात विकासाची कामे केली आहेत, त्यामुळे येथील 97 ते 98 टक्के मतदान हे सुप्रिया सुळेंनाच होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रियाताईच निवडून येतील असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.   

Web Title: Khutgao village supports Supriya Sule KaranRajkaran