#ElectionCommission लोकसभेबरोबर चार राज्यांत विधानसभेचे बिगूल

#ElectionCommission लोकसभेबरोबर चार राज्यांत विधानसभेचे बिगूल

Loksabha 2019  नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच देशात चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. लोकसभा निवडणूक देशात सात टप्प्यात होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागांसाठी 11 एप्रिलला मतदान होत आहे. तर, देशातील 22 राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. ओडिशातही लोकसभेच्या चार टप्प्यांच्या निवडणुका होणार आहेत.

या चारही राज्यांत लोकसभेच्या निवडणुकांसह विधानसभा निवडणूक होत असल्याने राजकीय धामधूम जोरात रंगणार आहे. या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com