Loksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. 

आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. आंबेडकर यांना आघाडीत सहभागी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, समाधानकारक जागा दिल्याशिवाय आघाडीत सहभागी होणार नसल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आता महाआघाडीची शक्‍यता राहिलेली नाही. त्यामुळे वंचित आघाडीने राज्यातील 48 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी सक्षम उमेदवारांचा शोध वंचित आघाडीतर्फे घेतला जात होता. मात्र आता वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  

लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात येणार आहे. यापुढील सर्व निवडणुका या वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुर्वी स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. 

मतदारसंघ निहाय उमेदवारांची यादी : 
1. धनराज वंजारी -वर्धा 
2. किरण रोडगे -रामटेक 
3. एन. के. नान्हे - भडांरा-गोंदिया 
4. रमेश गजबे -गडचिरोली (चिमूर) 
5. राजेंद्र महाडोळे - चंद्रपूर 
6. प्रवीण पवार -यवतमाळ (वाशीम) 
7. बळीराम सिरस्कार -बुलढाणा 
8. गुवणंत देवपारे -अमरावती 
9. मोहन राठोड - हिंगोली 
10. यशपाल भिंगे - नांदेड 
11. आलमगीर खान अखिल मोहम्मद खान - परभणी 
12. विष्णू जाधव - बीड 
13. अर्जुन सलगर - उस्मानाबाद 
14. राम गारकर - लातूर 
15. अजंली बावीस्कर - जळगाव 
16. नितीन कांडेलकर - रावेर 
17. शरदचंद्र वानखेडे - जालना 
18. सुमन कोळी - रायगड 
19. अनिल जाधव - पुणे 
20. नवनाथ पडळकर - बारामती 
21. विजय मोरे - माढा 
22. जयसिंग शेंडगे - सांगली 
23. सहदेव एवळे - सातारा 
24. मारूती जोशी - (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) 
25. अरूणा माळी - कोल्हापूर 
26. अस्लम बादशाहजी सय्यद - हाताकंगले 
27. दाजमल गजमल मोरे - नंदुरबार 
28. बापू बर्डे - दिंडोरी 
29. पवन पवार - नाशिक 
30. सुरेश पडवी - पालघर 
31. ए. डी. सावंत - भिवंडी 
32. मल्लिकार्जुन पूजारी - ठाणे 
33. अनिल कुमार - मुंबई साउथ दक्षिण 
34. संजय भोसले - मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य) 
35. संभाजी शिवाजी काशीद - ईशान्य मुंबई 
36. राजाराम पाटील - मावळ 
37. अरूण साबळे - शिर्डी

 

prakash ambedkar

prakash ambedkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: List of candidates of the vanchit bahujan aaghadi party is announced