LokSabha 2019 : भाजपचे शंभर उमेदवार निश्‍चित 

BJP
BJP

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या शनिवारी येथे झालेल्या बैठकीत लोकसभेसाठी शंभर उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. मात्र, या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 100 उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. उमेदवारांची नावे उद्या (रविवार) जाहीर केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या माध्यम विभागाकडून "सकाळ'ला देण्यात आली. 

2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला बहूमत मिळाले होते. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 282 जागा एकट्या भाजपला मिळाल्या होत्या. या योबतच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला एकूण 335 जागा मिळाल्या होत्या. 

2014 च्या लोकसभा निवडणूकीतील एनडीए चे बलाबल
भाजप    282
शिवसेना    18
अकाली दल    04
एलजेपी    06
टीडीपी    16
अन्य    09
एकुण     335

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com