Election Tracker: आज काय म्हणाले, अमित शहा?

Election Tracker: आज काय म्हणाले, अमित शहा?

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणालेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा?

5 मार्च, 2019

पाच वर्षांपूर्वी भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थैर्य ईशान्येत बाधा ठरत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फक्त शांतीच आणली नाहीतर ईशान्येला लागणारी गरज पूर्ण केली. त्यामुळे आता ईशान्यकडील राज्ये विकासाच्या मार्गावर चालत आहेत.

4 मार्च, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूएईकडून सर्वोच्च नागरी सन्मान 'झाएद पदका'ने पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. भारत आणि यूएई या दोन देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

- ट्विटर 

29 मार्च, 2019 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बिहारमधील 40 पैकी 40 जागा जिंकेल. भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी प्रयत्न करतील. भाजप, संयुक्त जनता दल आणि लोजप एनडीएतील या तिन्ही घटकपक्षांनी एकत्र येऊन मोदींना विजयी करण्याचे ठरविले आहे.

28 मार्च, 2019 

येत्या काही दिवसांत आपल्याला ठरवायचे आहे, की पुढचा पंतप्रधान कोण असेल? देशातील जनतेने हेही ठरवायचे आहे, की देशातील सरकार कोणाकडे असेल आणि कोणत्या पक्षाकडे असेल. तसेच या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी जिथं कुठं जातो, तिथे फक्त एकच घोषणा ऐकायला मिळतात, की 'फिर एक बार मोदी सरकार'

- अमित शहा, तेओक, आसाममधील जाहीरसभा

26 मार्च, 2019

यापूर्वी एकमेकांचे चेहरेही न पाहणारे नेतेमंडळी आज नरेंद्र मोदीजी यांना घाबरून पुढे येत आहेत. मात्र, मी आता सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला एकत्र व्हायचं आहे, त्यांनी व्हावे. उत्तर प्रदेशातील जनतेने 80 पैकी 74 जागांवर 'कमळ' फुलविण्याचा विचार केला. 

24 मार्च, 2019 

संपूर्ण देश मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवू इच्छितो. देशातील जनतेने जात-पातीचे राजकारणाला तिलांजली देऊन 'सबका साथ, सबका विकास' करणाऱ्याला पसंती दिली.

23 मार्च, 2019 

काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांची पाठराखण करतेे. त्यामुळे मला आता काँग्रेसच्या हातात सत्ता द्यायची नाही. जनतेला तुमची ही सर्व कामे माहीत आहे. त्यामुळे आता तुम्हालाही जनता 'किनारा' दाखवले.

22 मार्च, 2019 

बिहार ज्ञान, विद्ववान आणि थोर पुरुषांची भूमी आहे. बिहारदिनानिमित्त सर्व बंधू-भगिणींना शुभेच्छा देतो. राज्याच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत.

19 मार्च, 2019 

नव्याने शपथ घेतलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मला विश्वास आहे, की हे नवे नेतृत्त्व गोव्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल. जशी वचनं दिली ती पूर्ण केली जाईल. त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा.

16 मार्च, 2019 

''कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला सोडून देण्याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहनसिंगही उपस्थित होते. अझहरला सोडून देण्याबाबतची कल्पना सोनिया गांधी यांनाही होती'', अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या ब्लॉगमधून दिली.

15 मार्च, 2019 

'फिर एक बार मोदी सरकार' या संकल्पानुसार 'भाजप-अपना दल' युती करून उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक सोबत लढविणार आहे. अपना दल राज्यातील दोन जागांवर निवडणूक लढविणार आहे. यामध्ये अनुप्रिया पटेल या मिर्झापूर मतदारसंघातून लढणार आहेत. तसेच दुसऱ्या जागेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असून, त्यानंतर चर्चा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com