Election Tracker : अरविंद केजरीवाल काय म्हणाले आज?

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 मार्च 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ...प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच...या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?  

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ...प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच...या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?  

23 मार्च 

हिटलरही सत्तेसाठी हेच करत होता. हिटलरचे गुंड लोकांना मारहाण करत होते. त्यांची हत्या करीत होते. ज्यांना मारहाण होत होती त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात होते. आता मोदीजीही सत्तेसाठी हेच करत आहेत. हिटलरच्या रस्त्यावर चालत आहेत. पण मोदींच्या समर्थकांना दिसत नाही की आपला भारत कुठं चालला आहे आता.

20 मार्च, 2019

नाही सर, तुमच्या तोंडात लोकशाही आणि सहकार्याची भाषा चांगली वाटत नाही. तुम्ही दिल्लीतील लोकांना वेळोवेळी रोखले. शाळा, रुग्णालय, सीसीटीव्ही, दवाखाना यांसारखी कामे रोखली. मात्र, आम्ही दिल्लीकरांसाठी कामे मंजूर करण्यासाठी खूप विनंत्या केल्या. एकदा तर दहा दिवस उपोषण केले. हेच सहकार्य का ते?, असा सवाल केजरीवालांनी अरुण जेटलींना केला.

 

19 मार्च

मोदीजी संपूर्ण देशाचे 'चौकीदार' बनण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हीदेखील आपल्या मुलाला चौकीदार बनवू इच्छित असाल तर तुम्ही मोदींना मत द्या. जर आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवू इच्छित असाल तर सुशिक्षित लोकांच्या आम आदमी पक्षाला मत द्या.

- ट्विटर

18 मार्च, 2019

मला एक 29 वर्षांचा मुलगा भेटला. 24 वर्षांचा असताना त्याने मोदीजींना मतदान केले होते. त्याचे कारण म्हणजे रोजगाराची मिळणारी संधी. तो तरुण अजूनही बेरोजगार आहे. त्याला नोकरी मिळाली नाही अन् लग्नही झाले नाही. जर त्याने पुन्हा एकदा मोदींना मत दिलं तर तो 34 वर्षांचा होईल. तोपर्यंत खूप उशीर होईल. त्यामुळे यावेळी मोदींना मत देऊ नका.  

टि्वटर

17 मार्च 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. राजकारणात साधेपणाचे प्रतीक असे ते होते. ते अत्यंत नम्र होते. त्यांच्या जाण्याचे मोठे दु:ख सहन करण्याची शक्ती देव त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना 

- ट्विटर

15 मार्च, 2019 

''पोलिसांनी कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय छापेमारीची कारवाई केली. हे काय चालले आहे? ही कसली कारवाई आहे? तसेच पोलिस आणखी एका कॉल सेंटरवर पोहचले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्व्हरची माहिती आणि आमचा डाटा मागितला जात आहे''.

- ट्विटरवरून अरविंद केजरीवाल

14 मार्च, 2019

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

''दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचे विधान आश्चर्यकारक वाटत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत काहीतर गडबड आहे''.

- आम आदमी पक्षासोबत कोणतीही आघाडी केली जाणार नाही, असे वक्तव्य शीला दीक्षित यांनी केले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटवरून सांगितले.

Web Title: Loksabha Election Traker For Arvind Kejriwal