Election Tracker: आज काय म्हणाले, अमित शहा?

Election Tracker: आज काय म्हणाले, अमित शहा?

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा?

26 मार्च, 2019

यापूर्वी एकमेकांचे चेहरेही न पाहणारे नेतेमंडळी आज नरेंद्र मोदीजी यांना घाबरून पुढे येत आहेत. मात्र, मी आता सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला एकत्र व्हायचं आहे, त्यांनी व्हावे. उत्तर प्रदेशातील जनतेने 80 पैकी 74 जागांवर 'कमळ' फुलविण्याचा विचार केला. 

- ट्विटर

20 मार्च, 2019 

जर सर्वांची कामे वेगवेगळी असतील पण सर्वांना हा अधिकार आहे. आपल्या वाट्याचा जो भार आहे. त्याचे आम्ही पहरेदार आहोत. 'हाँ देश हम भी तैयार है तेरे हम भी चौकीदार हैं'

19 मार्च, 2019 

 
नव्याने शपथ घेतलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मला विश्वास आहे, की हे नवे नेतृत्त्व गोव्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल. जशी वचनं दिली ती पूर्ण केली जाईल. त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा.

- ट्विटवर 


18 मार्च, 2019

पर्रीकरांना आदरांजली. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे संपूर्ण देश आणि विशेषत: गोवा मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. त्यांचे हे कार्य नक्कीच प्रेरणादायी होते.

17 मार्च, 2019  

मनोहर पर्रीकरजी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. देशाने खरा देशभक्त गमावला. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी व्यतित केले. पर्रीकरांचे काम त्यांचा शब्द खरंच एक अत्यंत चांगले उदाहरण होते. 

16, मार्च, 2019

''कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला सोडून देण्याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहनसिंगही उपस्थित होते. अझहरला सोडून देण्याबाबतची कल्पना सोनिया गांधी यांनाही होती'',

- अमित शहा यांनी दिली ब्लॉगमधून माहिती. 

15 मार्च, 2019

'फिर एक बार मोदी सरकार' या संकल्पानुसार 'भाजप-अपना दल' युती करून उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक सोबत लढविणार आहे. अपना दल राज्यातील दोन जागांवर निवडणूक लढविणार आहे. यामध्ये अनुप्रिया पटेल या मिर्झापूर मतदारसंघातून लढणार आहेत. तसेच दुसऱ्या जागेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असून, त्यानंतर चर्चा होणार आहे''.

- अमित शहा, ट्विटवरून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com