Election Tracker : आज काय म्हणताहेत राहुल गांधी?

शुक्रवार, 19 एप्रिल 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रत्येक भाषणाची, मतांची इथे होईल नोंद.  

18 एप्रिल 19
कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशामधील वाढती बेकारी, शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी गंभीर समस्यांना मोदीच जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, 'मोदींच्या कारभारामुळे रोज देशातील 27 हजार युवक बेकार होत आहेत. कृषी क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने मोदी यांनी स्वत:चा उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये दिले. हे एकप्रकारे देशद्रोही वर्तनच आहे. या गैरकृत्यांबद्दल मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे.' 

17 एप्रिल 19 -
वायनाड : 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की दक्षिणेतील मतदारसंघ देशासाठी महत्त्वाचा भाग आहे. दक्षिणेतील लोकांचा आवाज इतरांपेक्षा भक्कम आहे,' असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सांगितले. 'मला तुमचा मुलगा. खरा मित्र समजा,' अशा शब्दात त्यांनी मतं देण्याचे आवाहनही यावेळी जनतेला केले.  पुढे ते म्हणाले, 'केरळ राज्य एकात्मकतेचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. राज्यात विविध जाती-धर्माचे लोक इथं ऐक्याने राहतात. त्यामुळे तुम्हालाच माहीत आहे, इतरांचा आदर करायचा कसा...'

15 एप्रिल 19
@RahulGandhi
दिल्ली : दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूकीसाठी एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'दिल्लीत 7 मतदारसंघातून 4 मतदारसंघ काँग्रेसने आपसाठी सोडले आहेत. आता आपची पाळी आहे. अरविंद केजरीवाल यांनी यू-टर्न घेतला असला तरी काँग्रेसचे दार त्यांच्यासाठी उघडे आहे.'

11 एप्रिल, 19
@RahulGandhi

'भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी 2 करोड नोकऱ्या, बँक खात्यात 15 लाख आणि अच्छे दिन असे काही मिळाले नाही. त्याजागी नोकऱ्या नाही, नोटबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गब्बर सिंग टॅक्स, सुटबूटवाली सरकार, राफेल
घोटाळा, खोटं, खोटं, खोटं, अविश्वास, हिंसा, द्वेष, भीती हेच मिळाले आहे. 
तुम्ही आज भारताच्या भविष्यासाठी मतदान करत आहात. तेव्हा शहाणपणाने मत द्या.'

10 एप्रिल, 19
@RahulGandhi

आज राहुल गांधी त्यांचा उमेदवारी मतदारसंघ अमेठी येथे प्रचार रॅलीत होते. येथील फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी लिहीले, 'अमेठी आणि येथील लोकांशी प्रेम आणि सन्मान या गोष्टींचा वर्षांपासून जुना संबंध आहे. येथील मातीत एक वेगळीच भावना आहे, जी न्यायासाठी लढण्याची ताकद देते. या प्रेम आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.'

9 एप्रिल 2019
हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्‍सी आणि नीरव मोदी यांसारख्या उद्योगपतींना गेल्या पाच वर्षांत बराच फायदा झाल्याचे राहुल म्हणाले. पुढे ते म्हणाले, मोदींनी केवळ आश्‍वासनाचा पाऊस पाडला. घोषणांनी जनतेला फसवले.

8 एप्रिल 2019
@RahulGandhi
https://twitter.com/RahulGandhi/status/1115171726504144896
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन 'अब न्याय होगा' हे काँग्रेसचे प्रचार गीत ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'न्याय या संकल्पनेसह काँग्रेसने जाहिरनामाद्वारे भारताच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मोहिम राबविण्याचा प्रयत्न राहील.'

7 एप्रिल 2019 - 
@RahulGandhi
https://twitter.com/RahulGandhi/status/1114863253614735360
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'मिस्टर मोदी तुम्ही कितीही पळ काढला तरी लपू शकत नाही. तुम्ही जे केलंय ते तुमचा पिच्छा करत राहील. तुमच्या आवाजातूनच जे तुम्ही लपवताय ते देशाला कळू शकतं. खरं हे खूप शक्तीशाली असतं. मी तुम्हाला आव्हान करतो की भ्रष्ट्राचारावर तुम्ही वादविवाद करुन दाखवा.'

5 एप्रिल 2019 - 
पुणे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 5) हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थांशी संवाद साधला. 'भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या?' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. 
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु म्हणजे लालकृष्ण अडवानी. आपल्या गुरुला नमस्कार करणे ही परंपरा आहे. मात्र, मोदींनी त्यांना कधी नमस्कार केला नाही. याउलट मोदींनी त्यांना चप्पल मारून बाहेर काढले, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर आज (शुक्रवार) निशाणा साधला. चंद्रपूर येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते.

4 एप्रिल 2019 - 
नागपूर: काँग्रेसने आणलेली 'न्याय' योजना तज्ज्ञांशी विचार करुन मांडली आहे. त्यामुळे ही न्याय योजना देशातील गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. तसेच 'काँग्रेस काम करते आणि भाजपकडून फक्त आश्वासने दिली जातात. जेव्हा राफेल करार गेला तुम्ही तेव्हा कुठं होता. कधीतरी खोट्याचं पितळ उघडं पडतंच. मी माशाचा डोळा पाहिलाय, आता अचूक बाण मारेनच. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेतून 72 हजार रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. 

2 एप्रिल 2019 - 
काही महत्त्वाकांक्षी जनहितार्थ घोषणा असलेला जाहीरनामा काँग्रेसने आज प्रकाशित केला. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना आणि पक्षाच्या घोषणांचा अधिकृत दस्तावेज जनतेसमोर मांडताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाख रुपये, वार्षिक दोन कोटी रोजगार या आश्‍वासनांची खिल्ली उडवताना 'आमच्यावर विश्‍वास ठेवा, आम्ही खोटी आश्‍वासने देणार नाही' असे आवाहन मतदारांना केले. काँग्रेसचा जाहीरनामा सर्वांची 'मन की बात' असून रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, 72 हजार रुपये देणारी न्याय योजना हेच मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असेल. या वावटळीत भाजपने हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर चालविलेला प्रचार उडून जाईल, असा दावा करताना राहुल गांधींनी मोदींना राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार, परराष्ट्र धोरण यावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. चौकीदार लपू शकतो; पण पळ काढू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

1 एप्रिल 2019 - 
@RahulGandhi ट्विटर

वास्तविक स्मार्ट सिटी चांगल्या नेत्यांनी बांधली आहेत.
आमच्या शहरांमध्ये जीवनशैली सुधारण्यासाठी आम्ही 5 वर्षांच्या व निर्वाचित परिषदेसह थेट मेयरमधून निवडून जाऊ.
महापौर व परिषदेला जबाबदार असलेल्या विशेषज्ञ आणि विशेषज्ञांच्या बहु-अनुशासनात्मक कार्यसंघाद्वारे प्रशासन संचालित केले जाईल.

31 मार्च 2019 - 
मी मोदी नाही. मी कधी खोटं बोलत नाही. मोदींनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी सांगितले होते, की तुम्हाला 15 लाख रुपये दिले जातील. ते एक खोटं होतं. त्यांचे सरकार तुम्हाला 15 लाख रुपये देऊ शकत नाही. पण आमचे सरकार सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देईल, असेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका प्रचारसभेत राहुल गांधी यांचे वक्तव्य. 

27 मार्च 2019 -
@RahulGandhi - ट्विटर
'मिशन शक्ती' यशस्वी झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी DRDOचे अभिनंदन केले आहे. तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे पण सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या आहेत.

26 मार्च 2019 -
गंगानगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरीबी हटाओ'ची साद घालत गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणाऱ्या 'न्यूनतम आय' योजना (न्याय) या किमान उत्पन्न हमी योजनेचे आश्‍वासन दिले. त्यावर आज (मंगळवार) राहुल गांधी म्हणाले, '2019 नंतर देशात गरीबी नसेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेसने गरीबीबाबत दिलेले आश्वासन एकप्रकारचा 'बॉम्ब'च आहे. गरीबीवर केला जाणारा हाच काँग्रेसचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. त्यांच्याकडून (भाजप) गरीबी नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, आता आम्ही गरीबी नष्ट करणार आहोत'.

25 मार्च 2019 - 
@RahulGandhi - ट्विटर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरिबी हटाओ'ची साद घालताना गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणाऱ्या न्यूनतम आय योजना (न्याय) या किमान उत्पन्न हमी योजनेचे आश्‍वासन दिले आहे. या ऐतिहासिक योजनेतून देशातील 25 कोटी गरिबांना न्याय देणार आहोत, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी आज केली. सर्वांना न्याय, सर्वांना सन्मान. नाही बनू देणार दोन हिंदुस्तान. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

23 मार्च 2019 -
@RahulGandhi - ट्विटर

आजच्या निवडणुकीच्या मेळाव्यामध्ये मला दिलेल्या प्रेम आणि उत्साहवर्धक समर्थनासाठी मालदाचे आभार. आम्ही बंगालच्या लोकांसाठी काम करण्यासाठी आणि आमच्या भावनात्मक बंधनांना बळकट करण्यासाठी काँग्रेस पार्टीत शिफारस केली आहे, ही खऱ्या परीक्षेची वेळ आहे.

22 मार्च 2019 -
@RahulGandhi - ट्विटर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकीदारच चोर असल्याचे संबोधले आहे. एका वृत्त मिडीयाच्या बातमीला टॅग करत गांधी म्हणाले, 'भाजपचे सर्व चौकीदार चोर आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नावे गांधी यांनी ट्विटमध्ये घेतली आहेत. तसेच 'भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 1800 कोटी रुपये भाजपाच्या केंद्रीय समितीला वाटले असा आरोप काँग्रेसने केला आहे.'

21 मार्च 2019 -
इंफाळ येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेस पक्ष हा ईशान्य भारतातील नागरिकांचा इतिहास, संस्कृती आणि भाषा यांची सुरक्षा आणि संवर्धन करण्यास सक्षम आहे.' तसेच नागरिकत्व कायदा 2016 हा राज्यसभेत आम्ही अडवून ठेवला असल्याचाही दावा केला. मोदींनी ईशान्य भारतातील मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाचे 'लुक ईस्ट' धोरण याचे नाव बदलून 'ऍक्ट ईस्ट' धोरण असे केले. त्याशिवाय मोदींनी तेथे काही केले नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

20 March 2019 -
@RahulGandhi - ट्विटर

एका वृत्त मिडीयाच्या वृत्ताला ट्विट करत राहुल गांधी देशातील बेरोजगारी बाबत बोलले आहेत. ते म्हणाले, 'मला वाटलं होतं की देशात प्रत्येक दिवसाला 450 नोकरीचे पर्याय उपलब्ध होतात. पण मोदींच्या पॉलिसीमुळे 2018 मध्ये देशात 1 करोड नोकऱ्या संपवल्या. 27 हजार नोकऱ्या 2018 मध्ये रोज आपण गमावल्या आहेत. भारताचे पंतप्रधान हे एक विनोद आहेत.' 

19 मार्च, 2019 -
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाभिमानावर प्रश्न उभा केला. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत मोदींनी भारताच्या 'प्रादेशिक अखंडतेचा' मुद्दा उपस्थित न करण्याचा आरोप केला. काही काळापूर्वीच शी यांच्याशी झालेल्या गुजरात येथील बैठकीत मोदी यांनी चीन-भारत यांच्या सीमेवर ताणलेल्या तणावाबाबत एकही शब्द उच्चारला नसल्याची नाराजी व्यक्त केली.  

18 मार्च 2019 - 
नवी दिल्ली : भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेवर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सर्व भारतीय म्हणत आहेत चौकीदार चोर आहे, अशी टीका केली. तसेच त्यांनी कोणीतरी सुषमा स्वराज यांनाही ट्विटर हँडलला चौकीदार शब्द लावण्यास सांगावे असा सल्ला दिल्यानंतर लगेच स्वराज यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून चौकीदार सुषमा स्वराज असे करण्यात आले.

16 मार्च 2019 -
'मैं भी चौकीदार' (#MainBhiChowkidar) हा हॅशटॅग सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट केले. ज्यात एक फोटो जोडलेला आहे. त्या फोटोत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अनिल अंबानी, विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्षी यांचे चेहरे आहेत. राहुल गांधी म्हणतात, 'बचावात्मक ट्विट आहे श्री मोदी! तुम्हाला आज थोडं अपराधी वाटत असावं?'

15 मार्च 2019 -
काल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या टॉम वडक्कन यांच्याबाबत बोलताना राहुल गांधी छत्तीसगड येथे म्हणाले, 'वडक्कन यांच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसला कोणताही झटका लागलेला नाही. वडक्कन कुणी मोठे नेता नव्हते.'

14 मार्च 2019 -
@RahulGandhi - ट्विटर

जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा मुख्य मसहुद अजहर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत चीनने भारताला पाठ दाखवली. यावर गांधी यांनी मोदींवर टिकास्त्र डागले. 
@RahulGandhi राहुल गांधी

'मोदी हे शी जिंगपिंगला घाबरले. त्यांच्या तोंडून साधा एक शब्दही निघाला नाही जेव्हा चीनने भारताविरोधात पाऊल उचलले. 
नमो यांची चीन बद्दल कुटनिती :
- गुजरात येथे शींच्या मागेपुढे केले. 
- दिल्ली शींची गळाभेट घेतली.
- चीनमध्ये शींसमोर झुकले.'

13 मार्च 2019 -
चेन्नईत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्टेला मैरिस कॉलेज मधील विद्यार्थ्यांची आज (बुधवार, ता. 13) मने जिकंली. जिन्स-टी शर्ट मध्ये आलेले ‘राहुल’ यांनी खूप कुल अंदाजात विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की कोणत्याही बाबतीत महिला ही पुरुषांपेक्षा दुय्यम नाही. महिलांनी प्रत्येकच गोष्टीत पुरुषांसोबत समान पातळीवर असले पाहिजे. मोठमोठ्या कंपन्या, लोकसभा, विधानसभा, सरकारी-खासगी सेक्टर्स इथे कुठेच स्त्रियांची पुरेशी लिडरशीप बघायला मिळत नाही. त्यामुळेच आम्ही असे ठरवले आहे की संसद आणि सगळ्याच सरकारी नोकरीत महिलांना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न करू. महिला सबलीकरण जर भारतात पाहिजे असेल तर आधी महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हायला पाहिजे. आपणही महिलांना प्रतिनिधित्व करण्यास आग्रह धरला पाहिजे. मला वाटतं की महिला या पुरुषांपेक्षा हुशारच असतात.’

Web Title: Loksabha Election Traker For Congress President Rahul Gandhi