Loksabha 2019 : देशभर 95 जागांसाठी मतदान

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 18) रोजी अकरा राज्ये आणि केंद्रशसित पुद्दुचेरी मिळून 95 जागांसाठी मतदान होईल.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 18) रोजी अकरा राज्ये आणि केंद्रशसित पुद्दुचेरी मिळून 95 जागांसाठी मतदान होईल. तमिळनाडूत लोकसभेच्या 39 मतदारसंघांपैकी 38 जागांवर, विधानसभेच्या 18 जागांसाठीही मतदान होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. या टप्प्यात 1,600 उमेदवार रिंगणात आहेत.

कर्नाटकातील 14, उत्तर प्रदेशातील आठ, आसाम, बिहार व ओडिशातील प्रत्येकी पाच, छत्तीसगड व पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्‍मिरातील दोन आणि मणिपूर, पुद्दुचेरीतील प्रत्येकी एका जागेचा उद्याच्या मतदानात समावेश आहे. ओडिशा विधानसभेच्या 35 जागांसाठीही उद्या मतदान होईल.

केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, ज्युएल ओराम, सदानंद गौडा, पोन राधाकृष्ण, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तसेच द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा आणि कनिमोळी, वीरप्पा मोईली, राज बब्बर आणि हेमामालिनी आदी नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

Web Title: For Loksabhas 95 Seats Voting is Today