Loksabha 2019 : मोदीजी, तेव्हा तुम्हाला पँट घालायची माहिती होते का?: कमलनाथ

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

'मोदी जेव्हा पँट घालायलाही शिकले नव्हते, तेव्हा नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या लष्कराची उभारणी केली.' असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जाहीरसभेत केले.

खांडवा : 'मोदी जेव्हा पँट घालायलाही शिकले नव्हते, तेव्हा नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या लष्कराची उभारणी केली.' असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जाहीरसभेत केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत कमलनाथ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

खांडवा जिल्ह्यात हरसूद येथील सभेत कमलनाथ बोलत होते. जेव्हा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची निर्मिती केली, तेव्हा तुम्ही पँट घालायलाही शिकले नव्हता, अशी टिप्पणी कमलनाथ यांनी मोदींवर केली.

काही दिवसांपूर्वी कमलनाथ यांच्या जनळच्या लोकांवर आयकर खात्याने छापे मारले होते, यावर एका सभेत बोलताना मोदी यांनी कमलनाथ यांचा उल्लेख भ्रष्टनाथ असा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ यांनी रविवारी मोदींवर टीका केली.      

Web Title: Madhya Pradesh CM Kamalnath criticized PM Narendra Modi