भाजप नेते म्हणतात, 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

महात्मा गांधी भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक होते. 

- अनिल सौमित्र, भाजप नेते

भोपाळ : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता भाजपे नेते अनिल सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले आहे.

प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने सूचना दिली होती. मात्र, प्रज्ञासिंह यांनी त्यांच्या या वक्तव्याबाबत माफी मागितली. त्यानंतर आज पुन्हा भाजपच्या आणखी दोन नेत्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली. यावरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

Image may contain: text

त्यानंतर सौमित्र यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये ते म्हणाले, महात्मा गांधी भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi was father of Pakistan Nation says Anil Saumitra

टॅग्स