'चौकीदारही चोर है' विरुद्ध 'मैं भी चौकीदार' 

Narendra Modi rahul Gandhi
Narendra Modi rahul Gandhi

नाशिक : जगात कुठेही काहीही घटना घडली तर सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पडतात. त्याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या 'चौकीदारही चोर है' विरुद्ध 'मैं भी चौकीदार' या मोहिमांमधील लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला देशाचा चौकीदार असल्याचे भाषणात म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चौर है' असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर या दोन्ही राष्ट्रीय नेत्यांनी उच्चारलेली वाक्‍ये सध्या तरुणाई आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्टेटस म्हणून वापरत आहेत. पंतप्रधान मोदींच्या कामापासून खूश नसलेल्या व राहुल गांधी यांच्याशी प्रभावीत झालेल्या तरुणाईकडून सोशल मीडियावर 'चौकीदारही चोर है' असे स्टेटस ठेवताना आपले मत नोंदविले जाते आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांना समर्थन करणाऱ्या तरुणाईकडून 'मैं भी चौकीदार' असे स्टेटस ठेवले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com