Loksabha 2019 : ममता बॅनर्जी विकासाला 'स्पीड ब्रेकर' : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

- ममता बॅनर्जी यांच्यामुळे राज्याचा विकास होऊ शकला नाही.

- विकासाच्या मुद्याला ममता बॅनर्जी या 'स्पीड ब्रेकर' ठरत आहेत.

सिलिगुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'स्पीड ब्रेकर' दीदी म्हणून आज (बुधवार) केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''बंगालचा विकास 'स्पीड ब्रेकर' दीदींमुळे होऊ शकत नाही. आता त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भाजप बांधिल आहे''.

पश्चिम बंगालमधील सिलिगुरी येथे आयोजित एका जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, देशातील इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने विकास झाला, त्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये विकास होऊ शकला नाही. ही बाब खरी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 'स्पीड ब्रेकर' आहे. त्याला 'दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना गरिबी दूर करायची नाही. जर गरिबी संपली तर त्यांचे राजकारणही संपेल. त्यामुळे त्यांना गरिबी पाहायची असून, गरिबांसाठी सुरु असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना थांबवल्या आहेत. 'आयुष्यमान योजना', शेतकऱ्यांना फायदा होणाऱ्या योजना रोखल्या. तसेच त्यांनी रेराची (RERA) अंमलबजावणी करण्यासही नकार दिला.

Web Title: Mamata Banjerjee Is Speed Breaker Says PM Narendra Modi