Loksabha 2019 : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा चक्क जाहीरनाम्यात उल्लेख

DMK
DMK

चेन्नई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमके या पक्षाने आज (ता. 19) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण या जाहीरनाम्यात एका आश्वासनामुळे केवळ तमिळनाडुतच नव्हे, तर देशभरात खळबळ माजली आहे. या जाहीरनाम्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱयांची सुटका करणार असे धक्कादायक आश्वासन दिले आहे. पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन व इतर ज्येष्ठ नेतेमंडळींनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.  

जाहीरनाम्यातून मतदारांना खूश करण्याबरोबरच असे धक्कादायक आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे. याबरोबरच नोटाबंदीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचेही आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. 

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका करणार या आश्वासनामुळे दक्षिणेकडील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. यापूर्वीही डीएमकेने राज्य सरकार व राज्यपालांकडे या प्रकरणातील आरोपींना सोडण्याची मागणी केली होती. पण आता तर थेट त्यांनी जाहीरनाम्यातच हे आश्वासन दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com