Loksabha 2019 : किरीट सोमय्या यांचा पत्ता कापलाच; मनोज कोटक यांना उमेदवारी

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे.   

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीदेखील त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. आता त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे.   

Web Title: Manoj Kotak to fight from North East Mumbai instead of Kirit Somaiya in Loksabha