Loksabha 2019 : आता 'या' नेत्याही लढविणार नाहीत लोकसभा!

Loksabha 2019 : आता 'या' नेत्याही लढविणार नाहीत लोकसभा!

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) केली. तसेच सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत आहे. पक्ष आणि जनतेच्या हितासाठीच आपण निवडणूक लढणार नसल्याचे मायावती यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील एक मोठा राजकीय चेहरा म्हणून मायावती ओळखल्या जातात. त्यांनी मुख्यमंत्रिपदही भूषविले आहे. तसेच त्या राज्यसभा खासदारही राहिल्या आहेत. मात्र, आता त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत त्या म्हणाल्या, ''पुढे गरज पडल्यास मी कोणत्याही जागेवरुन निवडणूक लढवू शकते. सध्या उत्तर प्रदेश राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही पक्षांची आघाडी झाली आहे. आमची ही आघाडी चांगल्या स्थितीत आहे''. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ''सध्या मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणूक लढवायचे ठरवले तर मनाई करुनही कार्यकर्ते माझ्यासाठी प्रचार करण्यास जातील. याचा परिणाम इतर जागांवर होईल. यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com