Loksabha 2019 : मोदींकडून जवानांच्या शौर्याचे मतांसाठी भांडवल : राज

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

- हिटलरसारखे मोदी वागत आहेत

- पत्रकारांचे स्वातंत्र्य काढून घेतले

मुंबई : आपले जवान सीमेवर खडतर मेहनत करून देशाचे संरक्षण करत आहेत आणि इकडे मोदी त्यांच्या शौर्याचे मतांसाठी भांडवल करत आहेत. आपले जवान काश्मीरमध्ये स्थानिकांचा मार खात आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, की पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसामुळे मोदी केक खायला गेले. त्यानंतर काही दिवसांतच पठाणकोटला हल्ला झाला. मत तुम्ही कशासाठी तिकडे गेले होते. भारतीय लष्कराने एअरस्टाईक केल्यानंतर पहिले ट्विट अमित शहाने केले. हवाईदलाचे प्रमुख सांगतात आमच्याकडे आकडे नाहीत. मग, भाजपला दहशतवाद्यांचा आकडा आला कोठून. तुम्ही प्रचारासाठी याचा वापर करणार असाल तर, विरोधकांनी पुरावे मागण्यात गैर काय? विचारले की देशद्रोही ठरविले जाते. हिटलरची अशीच वागणूक होती.

राज म्हणाले -

- हिटलरसारखे मोदी वागत आहेत
- पत्रकारांचे स्वातंत्र्य काढून घेतले
- सोशल मीडिया आहे म्हणून तुमच्यापर्यंत काही पोहचत आहे
- मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील आणि हेच झाले
- पुलवामातील हल्ल्याला आरडीएक्स आले कोठून?, काँग्रेस सरकारवेळी हेच मोदी विचारत होते
- पुलवामातील हल्ल्यावर मोदी राजकारण करत आहेत
- काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करताना भाजपला लाज नाही वाटली.

Web Title: Modi is Creating Issues of Martyr Soldier Lives for Votes says Raj Thackeray