Loksabha 2019 : जनतेने ठरवलंय, 'अब की बार मोदी सरकार'

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

8-10 जागांवर निवडून येणाऱ्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न

- पण जनतेने ठरविले 'अब की बार मोदी सरकार'

चंदोली : स्वप्न पाहणे चुकीचे नाही. पण 'अब की बार मोदी सरकार' हे जनतेने मनाशी ठरवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच देशाला स्थिर सरकार कसे देणार याचे उत्तर सध्या विरोधकांच्या आघाडीला सापडलेले नाही, असेही ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील चंदोली येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या फुटीरतावाद्यांना आम्ही कठोरपणे पावले उचलत आहोत. देशातील जवानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. त्यासाठी आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू. 

8-10 जागांवर निवडून येणाऱ्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न

महाआघाडीतील नेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, ज्या पक्षांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागले आहेत. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेने ठरवले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Web Title: Modi Government will Formed in India soon says Narendra Modi