Loksabha 2019 : प्रियांका गांधींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे झाली सभा

- काँग्रेस कार्यकर्त्यांसमोरच मोदी-मोदीच्या घोषणा.

बिजनौर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे काँग्रेसकडून रोड शो करण्यात आला. या रोड शोमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, प्रियांका गांधी यांच्या सभेतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसकडून प्रचारसभा घेण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे. त्यातच अनेक दिग्गज नेत्यांकडून आपली प्रतिष्ठा प्रणाला लावत प्रचार केला जात आहे. यामध्ये बिजनौर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांचा रोड शो झाला. यासाठी प्रियांका गांधी यांनी प्रचारात हजेरी लावली. काँग्रेसच्या या रॅलीत मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या. 

दरम्यान, काँग्रेसच्या नसीमुद्दीन सिद्दीकी यांचा सामना भाजपचे उमेदवार कुंवर भारतेंद्र सिंह आणि बसपचे उमेदवार मलूक नागर यांच्याशी होणार आहे.

Web Title: Modi Modi slogans in Priyanka Gandhis Road Show in UP