LokSabha2019 : मोदींनी पवार कुुटुंबाची चिंता करु नये : शरद पवार (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी कुटुंबावर टिका केली होती. या टिकेनंतर पवार कुटुंबातील सर्वांनीच मोदींच्या विधानाचा समाचार घेत पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करु नये अशा प्रतिक्रिया दिल्या.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी कुटुंबावर टिका केली होती. या टिकेनंतर पवार कुटुंबातील सर्वांनीच मोदींच्या विधानाचा समाचार घेत पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करु नये अशा प्रतिक्रिया दिल्या. कोल्हापूरातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडीक आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पवार बोलत होते.

मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुत्र अजित पवार यांच्या ताब्यात गेली असल्याची टिका केली होती. यावर पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणा एकट्याचा नाही तर राज्य व देशातील लाखो कार्यकर्त्यांचा आहे. मोदींनी गांधी कुटुंबावर देखील टिका केली. परंतु, गांधी घरण्याने देशासाठी मोठा त्याग केला असून, देशाच्या विकासात त्यांचे मोठे  योगदान आहे. माझ्यावर पंचगंगेच्या पाण्यात वाढलेल्या आईचे उपकार आहेत. अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन कुटुंबार टिका करणाऱ्या मोदींकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत. राष्ट्रवादीतील प्रत्येकजन पक्षाची काळजी करण्यास सक्षम आहे. असल्याचेही पवार म्हणाले. तसेच धनंजय महाडीक आणि राजू शेट्टी यांच्या मागे उभे रहाण्याचेही आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

Web Title: Modi should not worry about Pawar family says Sharad Pawar