Loksabha 2019 : अडवानींना अर्ज भरायला मदत करणारे आणि तिकीट कापणारे मोदी!

Loksabha 2019 : अडवानींना अर्ज भरायला मदत करणारे आणि तिकीट कापणारे मोदी!

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानी यांनी भाजप पक्ष मोठा करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अडवानी यांना भाजपचे भीष्माचार्य म्हणूनही संबोधले जाते. मात्र, आता याच भीष्माचार्यांना पंतप्रधान मोदींनी उमेदवारी नाकारली आहे.  

1991 मध्ये जेव्हा लालकृष्ण अडवानी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरत होते. तेव्हा त्यांना नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरताना मदत केली होती. तसेच भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांच्याकडे पाहत होते. मात्र, आता याच नेत्यांकडून त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com