Loksabha 2019 : मोहिते-पाटलांनी राज्यात विकासाचा डोंगर केला उभा : रणजितसिंह

वसंत कांबळे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- संपूर्ण राज्यात मोहिते-पाटील यांनी विकासाचा डोंगर उभा केला.

- मोहिते-पाटील म्हणजे विकासाचे समीकरण.

कुर्डु (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोहिते-पाटील यांनी विकासाचा डोंगर उभा केला. त्यामुळे राज्यात कुठेही जाल. तरी मोहिते-पाटील हे समीकरण ऐकायला मिळेल, असे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. 

माढा तालुक्यातील कुर्डू येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणजितसिंह बोलत होते. यावेळी लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य भारत कापरे, नामदेव हांडे, नितीन जगताप, गणेश गोंडगिरे, पवन पाटील, सूरज धोत्रे, विजय भगत, विनोद पाटील, सुरज पाटील, बंडू जाधव, नागनाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहिते-पाटील यांनी पिंपळखुटे, कुई येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी दरम्यान समस्या जाणून घेत होते. सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोहिते - पाटील यांनी विकास साधला आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत . हे विकासाचे योगदान समस्त महाराष्ट्र जाणून आहे . विरोधकांनी मात्र मोहिते - पाटील यांच्यावर आरोप करण्याचा एकलमी कार्यक्रम आखला आहे. मात्र, निवडणुकीनंतर वस्तुस्थिती समोर येणार असून, त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लगावला.

पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न जवळपास शंभर वर्षांपासून रखडलेला होता. यासाठी आम्ही सतत पाठपुरावा केल्यानंतर भाजप सरकारने १ हजार १४९ कोटींचा हा प्रकल्प मंजूर केला. कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉपला सुरवातीला ३० कोटी व त्यानंतर अर्थसंकल्पात ५६ कोटी मंजूर झाले. या प्रश्नासाठी गेल्या दहा वर्षांपासून विजयसिंह मोहिते-पाटील व स्वत: मी पाठपुरावा करीत होतो. मात्र, भाजप सरकारने हा प्रश्नमार्गी लावला. त्यामुळे आमदारकीच्या स्वार्थासाठी केवळ त्या मतदारसंघात सर्व जिल्हाचा निधी घालणाऱ्यांना सर्वसमावेशक विकास काय असतो ते कसे कळणार? असाही प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Mohite Patil did works of development in state says Ranjitsinh Mohite Patil