LokSabha2019 : नरेंद्र मोदी 26 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पंतप्रधान नेरेंद्र मोदी हे देखील उत्तर प्रदेशातील (युपी) वाराणसी मतदारसंघातून 26 एप्रिलला अर्ज भरणार आहेत. 2014 च्या निवडणूकीत मोदींनी गुजरात मधील अहमदाबाद आणि युपीतील वारणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

नवी दिल्ली : दिवसेंदिवस लोकसभा निवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. अशात देशातील महत्त्वाच्या लढतींकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्याचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंतप्रधान नेरेंद्र मोदी हे देखील उत्तर प्रदेशातील (युपी) वाराणसी मतदारसंघातून 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2014 च्या निवडणूकीत मोदींनी गुजरात मधील अहमदाबाद आणि युपीतील वारणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र, एकाच ठिकाणाहून निडणूक लढण्याच निर्णय मोदींनी घेतला आहे. 

वाराणसी मधील जनतेने बहुसंख्यमताने मोदींना निवडूण दिले होते. याच मतदार संघातून त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टी (आप) चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती. यावर्षी त्यांच्या विरोधात कुठल्याही पक्षाने अजूपर्यंततरी उमेदवार दिला नाही. असे असले तरी युपी मधील भीम आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी मोदींच्या विरोधात वारणसी मधून उभे राहणार असल्याचे जाहिर केले होते. परंतु, अजूपर्यंत त्यांनीही उमेदवारी अर्ज भरला नाही. 

Web Title: Narendra Modi File Nomination Form on 26 April