Loksabha 2019 : मोदी लुटारू; त्यांचे कपडे फाडा : अॅड. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कपडे फाडा

- संधीचे सोने करून मोदींना सत्तेखाली ओढा.

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कपडे फाडा. अन् संधीचे सोने करून त्यांना सत्तेखाली ओढा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच मोदी लुटारू आहेत, असेही ते म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करून व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे त्यांचा व्यापार डुबला. नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची सर्व मालकी ही गव्हर्नरची आहे. कोणत्याही नोटा बदलून देण्याचे काम हे त्यांचेच आहे. मग मोदींनी नोटबंदी केली कशी? हा अधिकार मोदींना दिला कोणी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच नोटबंदीकरून 60 टक्के व्यापाऱ्यांचे आणि 40 टक्के टॅक्स भरून घेतल्याने हा एकप्रकारे मोदींनी दरोडाच टाकला, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

2009 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, ती कर्जमाफी फक्त विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर होती. याचा खरा लाभ हा पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांना झाला. जर उद्धव ठाकरे म्हणतात, की सरकारवर अंकुश ठेवायचे काम ते करणार. तर मग गुजरातच्या हिरे व्यापाऱ्यांना त्यांच्या उद्योगासाठी एक लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले कसे? कारण हे सरकार शेतकऱ्यांचे नसून फक्त सरकार हे कारखानदारचे आहे. 

Web Title: Narendra Modi Looter Tear off their clothes says Prakash Ambedkar