Loksabha 2019 : 'मोदी पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करेन'

Loksabha 2019 : 'मोदी पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करेन'

लखनौ : नरेंद्र मोदी 2019 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील. जर असे न झाल्यास अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळच मी आत्महत्या करेन, असे वक्तव्य शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केले. तसेच कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रच सर्वश्रेष्ठ आहे, असेही ते म्हणाले.

रिजवी म्हणाले, नरेंद्र मोदी हेच कुशल पंतप्रधान आहेत. मी जेव्हा देश आणि देशहिताबाबत बोलतो. त्यावेळी मला कट्टरपंथीयांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. देशातून मोदी सरकार गेल्यास देशद्रोह्यांच्या हातून मारले जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या हातून मरण्यापेक्षा अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळ जाऊन आत्महत्या करून सन्मानपूर्वक जीवन संपवेल.

लोकांमध्ये मोदींप्रती प्रेम

देशातून मोदी सरकार गेल्यास आम्ही तुझे तुकडे-तुकडे करू, अशी धमकी मला मिळत आहे. त्यामुळे देशप्रेमी लोकांमध्ये मोदींप्रती प्रेम तर गद्दारांमध्ये भीती आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com