ModiWithSakal : गेल्या वर्षात दर महिन्याला दहा लाख नोकऱ्या दिल्या : मोदी

Narendra Modi Abhijit Pawar
Narendra Modi Abhijit Pawar

प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते?

उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे ईपीएफओ आणि ईएसआयसीच्या आकडेवारीवरून दिसते. म्हणजे वर्षात १.२ कोटी नोकऱ्या झाल्या. गेल्या चार वर्षांत एनपीएसचे ५५ लाख नवे सदस्य झाले आहेत. जवळ जवळ एक कोटी लोकांना पंतप्रधान रोजगार योजनेचा लाभ झाला आहे. आयटी क्षेत्रात नोकऱ्या वाढण्याची गती चांगली आहे, असा नॅसकॉमचा अहवाल आहे. एकंदर नोकऱ्यांमध्ये ज्या क्षेत्राचा फक्त १५ टक्‍क्‍यांचा वाटा आहे, त्या क्षेत्रात जर काही कोटी नोकऱ्या निर्माण होत असतील, तर नव्याने निर्माण होणाऱ्या एकूण नोकऱ्यांची संख्या काय असेल याचा विचार करा. मुद्रा आणि अन्य योजनांमुळे अनौपचारिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत मुद्रा योजनेअंतर्गत १७ कोटी कर्जे दिली गेली आहेत. त्यापैकी ४.३५ कोटी लोक पहिल्यांदाच व्यवसायात उतरत आहेत. याचा अर्थ असा, की जवळ जवळ चार कोटी लोकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्रांत ६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असं सीआयआयच्या सर्वेक्षणावरून दिसतं. गेल्या चार वर्षांत पर्यटकांची संख्या आणि पर्यटन व्यवसायातून होणाऱ्या कमाईत ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. म्हणजे पर्यटन क्षेत्रात नोकरीच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असाच याचा अर्थ नाही का? देशभरात लाखो सेवा केंद्रे कार्यरत आहेत, त्यामुळेही नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत का?

आता तिसरा मुद्दा पाहू. वेगवेगळे निकष. गेल्या काही वर्षांपासून भारत ही सर्वांत वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. १९९१ पासूनच्या सरकारांची तुलना केली तर आमच्या सरकारच्या काळात झालेली सरासरी वाढ सर्वोत्तम आहे. भारतातील दारिद्र्य अत्यंत वेगानं कमी होत आहे, असे आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात. हे सर्व नव्यानं निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांशिवाय शक्‍य आहे का?

भारतात होणारी थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक आहे. आधीपेक्षा दुप्पट वेगानं आपण रस्ते, महामार्ग, रेल्वे, घरे बांधतो आहोत. नोकऱ्यांशिवाय या सर्व पायाभूत सुविधा इतक्‍या वेगानं निर्माण करणे शक्‍य आहे का? भारत हे स्टार्टअपचं जगातलं सर्वांत मोठे केंद्र आहे. अॅपवर आधारित वेगवेगळ्या वाढत्या व्यवसायांबरोबर वाढणारी अर्थव्यवस्था आहे. हे नोकऱ्यांशिवाय कसे शक्‍य आहे? पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, ओडिशा ही राज्ये मोठ्या संख्येनं नोकऱ्या निर्माण करत असल्याचे सांगतात. मग राज्य सरकारे नोकऱ्या निर्माण करतात आणि केंद्र सरकार करत नाही, असे शक्‍य होईल का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com