Loksabha 2019 : नथुराम गोडसे देशभक्त : प्रज्ञासिंह ठाकूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

- नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील

- कमल हसन यांनी नथुराम गोडसेला म्हटले होते स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी. 

नवी दिल्ली : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (गुरुवार) केले. तसेच नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रज्ञासिंह यांनी यापूर्वी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले. यामध्ये त्या म्हणाल्या, नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल. 

दरम्यान, यापूर्वी अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसेला स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी म्हटले होते. त्यानंतर आता प्रज्ञासिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटले आहे.

Web Title: Nathuram Godse was Patriots says Pragya Singh Thakur