Loksabha 2019 : टीका झाली की इरिटेट होते : पार्थ पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 April 2019

वातावरण खूप चांगले आहे, शहरासह ग्रामीण भागातही राष्ट्रवादीची हवा आहे. शहरात हवा बदलण्यासाठी वेळ लागला. शेवटच्या पाच-दहा दिवसांत शहरात चांगला प्रचार केला. लोक आता सरकारच्या विरोधात बोलत आहेत. राज ठाकरे यांच्या सभांचा इम्पॅक्ट होत आहे. राज ठाकरेंनी व्हिडिओतून या सरकारची पोलखोल केली, या सभांचा फायदा होईल.

पिंपरी : टीका करून तुम्ही किती घाबरला आहात, हे दाखविता, हे इरिटेटिंग होते. टीका करून मते मिळत नाहीत. यातून मिळणार काय?, असे वक्तव्य मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले. 

पार्थ पवार यांनी साम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांचा इम्पॅक्ट होईल, असेही म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत असून, यांचा सामना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात होत आहे.

पार्थ पवार म्हणाले, की वातावरण खूप चांगले आहे, शहरासह ग्रामीण भागातही राष्ट्रवादीची हवा आहे. शहरात हवा बदलण्यासाठी वेळ लागला. शेवटच्या पाच-दहा दिवसांत शहरात चांगला प्रचार केला. लोक आता सरकारच्या विरोधात बोलत आहेत. राज ठाकरे यांच्या सभांचा इम्पॅक्ट होत आहे. राज ठाकरेंनी व्हिडिओतून या सरकारची पोलखोल केली, या सभांचा फायदा होईल. राज ठाकरेंनी सभांमधून मांडलेले मुद्दे लोकांना पटतात. काँग्रेसच्या योजनांची नावे यांनी बदलली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Parth Pawar talked about campaigning in Maval Loksabha constituency