Loksabha 2019 : सुप्रिया सुळे, मोहन जोशींचा अर्ज भरण्यासाठी महाआघाडी एकत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत आज दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. याशिवाय अजित पावर, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, सुषमा अंधारे, अभिजीत कदम, प्रविण गायकवाड इ. नेते उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, तुम्ही आमच्या कुटुंबाची काळजी करू नका, मी व माझी बहिण समर्थ आहोत असा टोला लगावला. तर महाआघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोहन जोशी हे जोशी असले तरी, बहुजनाळलेले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. 

पुण्यातील नरपतगिरी चौकात काँग्रेस-राष्ट्रवादीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रिया यांच्या घरातील सदस्यही उपस्थित होते. त्यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाआघाडीच्या नेत्यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन यावेळी या सर्व नेत्यांनी केले.

Web Title: NCP Congress comes together for filing form of Supriya Sule and Mohan Joshi for Loksabha Election