Loksabha 2019 : राष्ट्रवादीला धक्का; भारती पवार करणार भाजपमध्ये प्रवेश

Loksabha 2019 : राष्ट्रवादीला धक्का; भारती पवार करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार उद्या (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यातूनच दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 

भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसवर उमेदवारीच्या मुद्यावरून नाराज आहेत. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील काहींना उमेदवारी न देता ऐनवेळी आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज झाल्या आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

दरम्यान, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपवासी झालेले डॉ. सुजय विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com