Loksabha 2019 : खबरदार! मोदींवरील चित्रपट प्रदर्शित केलात, तर बघाच..!

Loksabha 2019 : खबरदार! मोदींवरील चित्रपट प्रदर्शित केलात, तर बघाच..!

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील "पीएम नरेंद्र मोदी' या चरित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या उद्रेकाला थिएटर मालक जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 

मोदी यांच्यावरील चरित्रपट म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून, यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मोदींचा प्रचार करण्यासाठी हा चित्रपट असून, त्याचा खर्च भाजपच्या प्रचारात धरणार का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com