Loksabha 2019 : काँग्रेसने फक्त चेले-चपाट्यांची गरिबी हटवली : नितीन गडकरी 

अशोक मुरुमकर 
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सोलापूर : कॉंग्रेस आमचा विरोधी पक्ष असला तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण स्विकार केला पाहिजे, असे उपरोधकपणे म्हणत कॉंग्रसने फक्त त्यांचे कार्यक्रर्ते, नेते, चेले- चपाटे आणि चमच्यांची गरिबी हटवली, अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रसेवर केली. 

सोलापूर : कॉंग्रेस आमचा विरोधी पक्ष असला तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण स्विकार केला पाहिजे, असे उपरोधकपणे म्हणत कॉंग्रसने फक्त त्यांचे कार्यक्रर्ते, नेते, चेले- चपाटे आणि चमच्यांची गरिबी हटवली, अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रसेवर केली. 

सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी भाजपची विजय संकल्प सभा झाली. गडकरी म्हणाले, पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी गरिबी हटवू असं सांगितलं होतं, आता त्यांचा पंतू राहुल गांधी सूद्धा गरिबी हटवू असं सांगत आहेत. आतापर्यंत कोणाची गरिब हटली मुस्लानांची, गरिबांची, दलितांची की कोणाची असा सवाल त्यांनी केला. कोणाला मेडीकल कॉलेज मिळाले, कोणाला इंजीनिअरींग कॉलेज मिळाले, कोणाला डीएड कॉलेज मिळाले तर कोणाला प्राथमिक शाळा मिळाली. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, आर्धा पगार आम्ही आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादीची गावोगावी रोजगार हमी, असे म्हणत गडकरींनी कॉंग्रस- राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. 

भाजपने सर्वसामान्यांच्या विकास योजना राबविताना कधीही जात पाहिली नाही. गरिबी, भुकबळी, बेरोजगारी ही या देशातील सर्वात मोठी समस्या आहे, पण कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाले यावर बोलत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 

गडकरी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 70- 72 वर्ष झाले. 60 वर्ष कॉंग्रेस- राष्ट्रवादीला सरकार चालवण्याची संधी मिळाली. पण काय झाले? 70 वर्षाचा इतिहास हा देशाच्या जनतेशी बेईमानी आणि विश्‍वासघात करण्याचा आहे, अशी जोरदार टीका करत कॉंग्रेसने 70 हजार कोटीची विमाने खरेदी केली. पण विदर्भ, सोलापूर जिल्ह्यातील पाण्याच्या योजना पुर्ण केल्या नाहीत, असा आरोप गडकरी यांनी केला.

Web Title: Nitin Gadkari criticized Congress at Solapur