Loksabha 2019 : कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही : फुटाणे

Loksabha 2019 : कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही : फुटाणे

मंगळवेढा : देश आठ-दहा श्रीमंतांच्या हातात गेल्याने लोकशाही धोक्यात आल्याची जाणीव झाली. नेत्यांची उंची कमी होताच पुतळ्यांची उंची वाढवली. उंच पुतळ्यांमुळे आपली आर्थिक स्थिती बदलणार नाही, अशा शब्दांत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच कुठलाही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही, असेही ते म्हणाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कवीसंमेलनात ते बोलत होते. या समेलनात कवी नारायण पुरी, अंकुश आरेकर, इंद्रजित घुले, शिवाजी बंडगर, शिवाजी सातपुते, गणेश गायकवाड यांनी सध्याच्या देशातील राजकीय स्थितीचे विदारक स्वरूप कधी हास्याच्या तर कधी वेदनेच्या रूपात मांडले.

फुटाणे म्हणाले, की संतांनी राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी स्वत:च राजकारणात घुसले, तर लोकांनी बघायचे कुणाकडे. सबंध देश किंगफिशरवाला आणि नीरव मोदीसाठी चाललाय अशा राज्यकर्त्यांना संतांची महाराजांची भिती वाटली पाहिजे. पण तेच जर खुर्चीच्या मागे लागत आहेत जात, धर्म, यांच्यातील द्वेष वाढविणार्‍यापेक्षा सर्वसमावेशक विचार करणार्‍या राष्ट्रीय पक्षाचा आपण विचार केला पाहिजे.

कुठलाही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. अटलजींनी खूप चांगल्या योजना आणल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या असत्या तर देशाचं चित्र बदललं असतं. शिंदे सर्वसमावेशक नेतृत्त्व असून, त्यांच्यासारखा नम्र, सुज्ञ आणि सुजाण नेता, जो विचारांना स्वातंत्र्य देईल, कलेचा आदर करेल त्यालाच निवडून दिले पाहिजे. शिंदेचा हा स्वभावच आम्हा सर्वांना सुज्ञपणाने पुढे घेऊन जाणारा आहे. वैचारिक मेजवानीने मतदारांच्या भूमिकेला जागृत करणारे उद्बोधन, प्रबोधनपर अशा संमेलनातील उत्स्फूर्त काव्यमैफलीस रसिक श्रोत्यांनी गर्दी केली. या काव्यमैफलीचे प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड.राहुल घुले यांनी केले.

रामभाऊ वाकडे, प्रा.शिवाजीराव काळुंगे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,युवराज शिंदे,महेश दत्तू, फिरोज मुलाणी, विजयकुमार खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे, मुरलीधर घुले, धनंजय खवतोडे, नाथा ऐवळे, पांडूरंग नाईकवाडी, राहूल सावंजी, रावसाहेब फटे, दिलीप जाधव, महादेव जाधव, सोमनाथ माळी, राहूल सावंजी, डॉ.शरद शिर्के, हजरत काझी, विनायक दत्तू, दत्तात्रय खडतरे, अजित यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com