Loksabha 2019 : आता 'या' नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

राजकुमार थोरात 
शनिवार, 16 मार्च 2019

राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशसचिव डॉ. अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील लासुर्णे असून, त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे.

वालचंदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशसचिव डॉ. अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील लासुर्णे असून, त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे.

पुण्यामध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून अर्चना पाटील कार्यरत आहेत. पाटील या रासपमध्ये प्रदेशसचिव पदावर कार्यरत होत्या. त्यांनी इंदापूर, बारामती तालुक्याचा भाग रासपच्या माध्यमातून पिंजून काढला होता. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधमू सुरु असून, बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप स्वत:च लढविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 2014 मध्ये बारामतीची जागा भाजपने रासप मित्रपक्षाला सोडली होती.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये भाजपने बारामतीची जागा स्वत: लढविण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर डॉ.अर्चना पाटील यांचा भाजपप्रवेश पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास सक्षमपणे सांभाळणार असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

Web Title: Now Archana Patil has entered in the BJP