Loksabha 2019 : काँग्रेस विरोधी पक्षात असले की त्यांचे महत्त्व कळतं : राज ठाकरे

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

- काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून भाजपने पुन्हा नव्याने आणल्या

- काँग्रेस विरोधी पक्षात असले की त्यांचे महत्त्व कळत आहे

मुंबई : काँग्रेसने सुरु केलेल्या योजनांची नावे बदलून यांनी त्याच योजना पुन्हा नव्याने आणल्या. मी मोदींच्या कामगिरीचा सातबारा मांडण्यासाठी 10 सभा घेणार आहे. आज आपल्याला काँग्रेस विरोधी पक्षात असल्याने त्यांचे महत्त्व कळत आहे. आज तुम्ही इंटरनेटवर सर्च केले तर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओळख फेकू अशी येते. थापा मारणारा माणूस अशी ओळख असणारे पंतप्रधान सतत खोटे बोलत राहिले, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आयोजित केलेल्या गुढीपाढवा मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. राज ठाकरेंनी यावेळी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीवर जोरदार टीकास्त्र सोडत इतकं स्पष्ट बहुमत असताना मोदींनी देशाची वाट लावली असे म्हटले.

राज ठाकरे म्हणाले, की मोदींनी गुजरातच्या विकासाचा खोटं बुजगावण उभे केले. निवडणुकीनंतर आपल्याला कळले की मोदींना आई आहे. कारण, ते सतत त्यांना भेटण्यासाठी कॅमेरे घेऊन जातात. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठीही ते कॅमेरामन घेऊऩ जातात. मोदी सतत खोटे बोलत आहेत. एअरस्टाइक आणि जवानांच्या शौर्याबद्दल ते सतत श्रेय घेत आहेत. आज अमेरिकेची संस्था म्हणतेय आम्ही पाकिस्तानला दिलेली विमाने तशीच आहेत. मोदी का खोटे बोलत आहेत, याचे त्यांनी उत्तर द्यावे. 30 वर्षांनंतर तुम्हाला बहुमत मिळाले होते. पण, तुम्ही काय करुन ठेवले.

तसेच ते पुढे म्हणाले, पंतप्रधान होण्यासाठी लोकांची आयुष्ये गेली. या सभेचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. आता परिस्थिती तशी आहे, त्यामुळे मी युतीविरोधात प्रचार करत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा असे वागले नसते तर मला तसे वागावे लागले नसते. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला एकमेकांचे उमेदवार नको आहेत.

Web Title: Now knows the importance Congress says Raj Thackeray