Loksabha 2019 : 'चौकीदारा'ला चौकीतून हटविण्याची वेळ : अखिलेश यादव

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

द्वेषाच्या भिंती पाडण्याची संधी या निवडणुकीमुळे उपलब्ध झाली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही देशात बदल घडविणार आहोत.

- अखिलेश यादव

लखनऊ : निवडणुकांपूर्वी हे सगळे 'चौकीदार' झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक 'चौकीदारा'ची चौकी काढून घेण्याचे काम आम्ही यंदाच्या निवडणुकीत करणार आहोत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवबंद येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची संयुक्त सभा झाली. या सभेत अखिलेश यादव बोलत होते. ते म्हणाले, सध्या द्वेष पसरवणारे नेते आले असून, त्यांच्याकडून तिरस्कार पसरवण्याशिवाय काहीच केले जात नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. तसेच आता आपल्याकडे इतिहास लिहिण्याची संधी आहे.

दरम्यान, द्वेषाच्या भिंती पाडण्याची संधी या निवडणुकीमुळे उपलब्ध झाली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही देशात बदल घडविणार आहोत, असेही अखिलेश यादव म्हणाले.

Web Title: Now Time to Remove Chowkidar From Chowki says Akhilesh Yadav