Loksabha 2019 : पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना आमचा पाठिंबा : कुमारस्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

-  काँग्रेसला आमचा पाठिंबा असेल.

नवी दिल्ली : निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होईल. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) काँग्रेससोबत आघाडी आहे. तसेच आता पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आमचा पाठिंबा असेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. 

कुमारस्वामी यांनी सांगितले, की आमचा पक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीला राज्यात 18 ते 19 जागांवर विजय मिळेल. तसेच माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख देवेगौडा म्हणाले, की आम्ही काँग्रेससोबत आहोत. मी या मुद्यावर आणखी काही भाष्य करू शकत नाही. 23 मेला या निवडणुकीचा निकाल येईल. त्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच संपूर्ण देशाला समजेल की पुढे काय होईल.

दरम्यान, काँग्रेसला आमचा पाठिंबा असेल, असा पुनरुच्चारही देवेगौडा यांनी यावेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our support for Rahul Gandhi as Prime Minister says HD Kumaraswamy