Loksabha 2019 : सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठीच मला उमेदवारी : डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी

swami
swami

सोलापूर : सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपने मला उमेदवारी दिली आहे. निवडून आल्यावर मी भाजपच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणार आहे, असे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. 

डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री विजय देशमुख यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नागणसूरचे महास्वामी, श्री. देशमुख, महापालिकेतील सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, विनायक विटकर, नागेश भोगडे उपस्थित होते. स्वागतानंतर भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. 

डॅा. जयसिद्धेश्वर म्हणाले, सोलापूरचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी भाजपने मला संधी दिली. त्यासाठी पालकमंत्री देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांचेही मोठे सहकार्य मिळाले. त्यांचा विश्वास निश्चितच सार्थ ठरविणार आहे. धर्म आणि दंड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे महाराजांनी किंवा वैराग्यांनी निवडणुका लढवू नयेत असा आरोप करण्यात काही अर्थ नाही.

पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही भाजपचाच खासदार होईल याबाबत कुणाचेही दुमत असणार नाही. भाजप आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होतील. दरम्यान, डॅा. जयसिद्धेश्वर महाराज आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (ता.25
भरणार आहेत. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल केला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

खासदार बनसोडे नॅाट रिचेबल

सोलापूरचे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे हे अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळणार असा दावा करीत होते. मात्र डॅा. जयसिद्धेश्वरांनी
बाजी मारली. यासंदर्भात बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते नॅाट रिेचेबल होते. आता त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com