Loksabha 2019 : लोकांना मूर्ख समजता का? : पी. चिदंबरम

Loksabha 2019 : लोकांना मूर्ख समजता का? : पी. चिदंबरम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान खेळलेले जातीचे कार्ड आणि चहावाल्याचा संदर्भ देत विरोधकांवर केलेल्या टीकेचा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज कठोर शब्दांत समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच लोकांना विस्मरणाचा आजार झालेला मूर्खांचा समूह समजतात का, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

तत्पूर्वी, कनौजमधील सभेत बोलताना मोदींनी आपला जातीय राजकारणावर फारसा विश्‍वास नसल्याचे म्हटले होते; यावर टीका करणाऱ्या ट्विटमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले व्यक्ती आहेत, की जे प्रथम पंतप्रधान बनले आणि नंतर त्यांनी जातीची वस्त्रे परिधान करून प्रचार केला. ते सुरवातीला ओबीसी असल्याचे सांगत होते. पण, आता आपली कोणतीही जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोदींनी 2014 आणि त्यानंतर लोकांनी एका चहावाल्याला निवडून दिले, असा सूर आळवला होता. पण, तेच मोदी आता आपण कधीच "चहावाला' या शब्दाचा उल्लेख केला नसल्याचा दावा करतात. मोदी लोकांना काय समजतात, विस्मृतीचा आजार झालेला हा मूर्ख लोकांचा समूह आहे, असे मोदींना वाटते का?'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com