Loksabha 2019 : भावाच्या पायगुणानेच राष्ट्रवादीची वाताहत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मृत शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनीही ‘जगमित्र’ या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्याबद्दल आरोप करणे दुर्दैवी आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाली. तसा, आमच्या भावाचा पायगुणच असल्याचा टोला पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.

नेकनूर - मृत शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनीही ‘जगमित्र’ या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्याबद्दल आरोप करणे दुर्दैवी आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाली. तसा, आमच्या भावाचा पायगुणच असल्याचा टोला पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला. 

भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ परिसरातील येळंबघाट (ता. बीड) येथे शनिवारी सभेत त्या बोलत होत्या. आमदार सुरेश धस, रमेश आडसकर, रमेश पोकळे, आमदार संगीता ठोंबरे उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, सिंचन प्रकल्प आपल्याच भागात नेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा कोरडा ठेवला. निधी देण्याऐवजी त्यांनी नेहमीच जिल्ह्यातील घरे फोडण्यावर भर दिला. आमच्याही घरात तेच केले. आमच्या भावाने जेव्हा नगरपालिका फोडली त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी झोपेत धोंडा घातल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र, अनेकदा संधी येऊनही कोणाचेही फोडण्याचे पाप मी केले नाही. कोण आपले, कोण परके हे न पाहता जिल्ह्यात भरघोस निधी दिला.

Web Title: Pankaja Mundhe criticize ncp in neknur