Loksabha 2019 : पार्थ पवार मनसैनिकांना म्हणाले, 'मी तुमच्यातलाच' (व्हिडीओ)

हर्षल भदाणे पाटील
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा आणि आपला नातू पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच पार्थ पवार चांगलेच कामाला लागलेत. सध्या पार्थ पवार मावळसह पनवेल मध्ये जोरात प्रचार करताना दिसत आहे. 

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा आणि आपला नातू पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच पार्थ पवार चांगलेच कामाला लागलेत. सध्या पार्थ पवार मावळसह पनवेल मध्ये जोरात प्रचार करताना दिसत आहे. 

गुढी पाडव्यादिवशी (ता. 6) तारखेला होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्याचे आयोजनाची पुर्व तयारीसाठी मनसे जिल्हा कार्यकरणीची बैठक कंळबोलीत हॉटेल पल्लवी अविदा येथे सुरू होती. याच वेळी पार्थ पवार आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावत मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेत पार्थ पवारांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  मी तुमच्यातलाच आहे, मला सहकार्य करा असं म्हणाल्यावर यावेळी मनसैनिक गणेश बनकर यांनी पार्थ पवार यांना हस्तांदोलन करत त्यांच्या गळ्यात मनसेचे मफलर घातला आणि तो पार्थ यांनी स्विकारलाही. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  त्याचबरोबर मावळमध्ये आघाडीचा उमेदवार निवडून  आणण्याचा मानस असुन मोदी, शहांविरोधात काम करण्याची ग्वाही मनसैनीकांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नऊ एप्रिलचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे.

Web Title: Parth Pawar meets MNS party workers