Loksabha 2019 : जनतेचा चौकीदारावर विश्‍वास : नरेंद्र मोदी 

Loksabha 2019 : जनतेचा चौकीदारावर विश्‍वास : नरेंद्र मोदी 

मोरान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्येतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकताना विरोधकांवर पुन्हा निशाणा साधला. अरुणाचलमध्ये एक आणि आसाममध्ये दोन सभा घेत मोदींनी प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवून दिला. विरोधकांच्या "चौकीदार चोर है' या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ""लोकांचा चौकीदारावरील विश्‍वास पाहून विरोधक धास्तावले आहेत.''

आसाममधील मोरान येथे आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले, ""कॉंग्रेसने देशाला जाणीवपूर्वक मागास ठेवले आणि जगात कमकुवत देश अशी प्रतिमा निर्माण केली. कॉंग्रेस पक्ष फक्त एका कुटुंबाची सेवा करतो, देशाच्या प्रगतीशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही.'' सर्जिकल स्ट्राइकचा हवाला देताना ते म्हणाले, की भारताने प्रथमच घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. सगळा देश या कारवाईमुळे आनंदित झाला असताना दोन मंडळी मात्र नाखूश आहेत, एक म्हणजे कॉंग्रेसचे कुटुंब आणि दुसरे दहशतवाद्यांचे घर. सगळे जग भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असताना कॉंग्रेसची मात्र झोप उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी आमच्या शास्त्रज्ञांनी अवकाशातील उपग्रह पाडला, तेव्हा कॉंग्रेसच्या डोळ्यांत पाणी आले होते.'' 

कॉंग्रेसकडून मलईचा विचार 

अरुणाचल प्रदेशातील आलो येथील सभेत मोदी म्हणाले, ""जामिनावर बाहेर पडलेली मंडळी चौकीदारावर टीका करत आहेत.'' लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची मोदींची अरुणाचलमधील ही पहिलीच सभा होती. ""कॉंग्रेसची नेतेमंडळी फक्त मलईचाच विचार करतात, आम्ही मात्र देशाची भलाई पाहतो,'' असेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com